अभ्यासक्रम
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या अभ्यासक्रमाचे शिक्षण आपल्या शाळेत दिले जाते.
अभ्यासक्रमेतर उपक्रम
नवीन शैक्षणिक धोरणानुसार, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध अभ्यासक्रमेतर उपक्रम आयोजित केले जातात. या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना कुशल बनवण्यासाठी पाया घातला जातो.
खगोलशास्त्र या विशेष अभ्यासक्रमाबरोबरच बहु-कौशल्ये या विषयांतर्गत इलेक्ट्रिकल, प्लंबिंग, पाककृती, शेती आणि बागकाम तसेच व्हॉइस ओव्हर, टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवणे हे विषयदेखील शिकविण्यात येतात. शास्त्रीय संगीत, नेचर क्लब यांसारख्या उपक्रमांद्वारे भारतीय संस्कृती आणि निसर्गाच्या जवळ जाण्याचे महत्त्व सांगितले जाते.
सामाजिक बांधिलकी जपण्याचे महत्त्व लक्षात घेऊन प्रशालेत इंटरॅक्ट क्लब चालविला जातो. वनराई उपक्रमाद्वारे जल, जंगल, जमीन यांचे संवर्धन करण्यास प्रोत्साहन दिले जाते. बालवैज्ञानिक आणि STEM प्रयोगशाळांद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विकसित केला जातो.
परीक्षेचे स्वरूप
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या नियमांनुसार परीक्षा घेतल्या जातात. सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जातात.
परीक्षांमध्ये, बहुपर्यायी लघु उत्तरे आणि दीर्घ उत्तरे असलेले प्रश्न समाविष्ट असतात. महाराष्ट्र राज्य मंडळाच्या नियमांनुसार सर्व प्रकारच्या परीक्षांची रचना केली जाते.
अभ्यासक्रम
एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार प्रशालेत मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल आणि संपूर्ण संस्कृत हे विषय शिकविले जातात. विज्ञान आणि गणित हे विषय इंग्रजीमध्ये शिकवले जाते. त्यासोबतच शाळेत जलसुरक्षा, संरक्षणशास्त्र, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण शिकवले जाते.