प्रवेश सुरु

आमच्याबद्दल

माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय (माध्यमिक विभाग) मध्ये आपले सहर्ष स्वागत

school

पुण्यातील नामवंत संस्था डेक्कन एज्युकेशन सोसायटीची माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय पुणे ही आपली शाळा न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडच्या प्रांगणात भरते. आपल्या प्रशालेचा माध्यमिक विभाग २०१४  पासून कार्यरत आहे. 

हवेशीर प्रशस्त वर्ग खोल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण करतात. इयत्ता दहावीच्या वर्गांमध्ये स्मार्ट बोर्ड तसेच इयत्ता आठवी व नववीच्या वर्गामध्ये प्रोजेक्टर यांच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने  विद्यार्थ्यांना अध्यापन केले जाते. शाळेची सुसज्ज प्रयोगशाळा तसेच स्टेम लॅब विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवते आणि संशोधन वृत्ती वाढीस लावते. काळाची पाऊले ओळखून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) मध्ये उल्लेख केलेल्या व्यावसायिक मार्गदर्शनासाठी Lend-a-hand आणि प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास अभ्यासक्रम केंद्र शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ पासून सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत Gardening and Agricultural techniques, Food technology, Electrical and Plumbing, Carpentry हे विषय शिकवले जातात.

सर्व प्रकारच्या खेळाचे साहित्य शाळेमध्ये असल्याकारणाने अभ्यासाबरोबर खेळाचाही विद्यार्थी आनंद घेतात. सुदृढ आणि निरोगी शरीर यावर भर दिला जातो. शाळेतील ग्रंथालयाचा वापर करून विद्यार्थी आपली वाचन संस्कृती जपतात. 

आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आनंददायी वातावरण देण्यास कटिबद्ध आहोत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विकास करणे, आजच्या स्पर्धात्मक जगासाठी त्यांना तयार करणे, त्यांच्या नवनिर्मिती क्षमतेला खतपाणी घालून संशोधनात्मक वृत्ती वाढीस लावणे यासाठी आम्ही  कार्यशील आहोत. 

आधुनिक तंत्रज्ञान युगासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे, त्याचबरोबर आपल्या संस्कृतीची जोपासना करण्यासाठी प्रेरित करण्याचे आमचे धोरण आहे. आम्हाला विश्वास आहे की आम्ही विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढीस लावण्यास यशस्वी होऊ,  त्यामुळे विद्यार्थी सर्व क्षेत्रांमध्ये प्रगतीपथावर राहतील. 

उद्दिष्ट

  • विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून त्यांना सुसंस्कारित, सशक्त, स्वावलंबी व राष्ट्राभिमानी नागरिक घडविणे. 
  • संस्कार, शिक्षण आणि क्रीडा यांचा समतोल साधत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणे. 
  • मराठी भाषेच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगणारे आणि आधुनिकतेशी जुळवून घेणारे विद्यार्थी तयार करणे. 
  • समाजासाठी हितकर विचारसरणी असलेल्या कर्तबगार व जबाबदार नागरिकांची पिढी घडविणे. 

ध्येय

  • विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक,बौद्धिक विकास होण्यासाठी विशेष प्रयत्न करणे.
  • सांस्कृतिक विकास व्हावा यासाठी विविध सण, उत्सव शाळेत साजरे करून त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोनाची माहिती सांगणे. 
  • शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल घडविण्यासाठी प्रेरणादायी व्याख्यानांचे आयोजन करणे.
  • शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी क्रीडा व शारीरिक प्रशिक्षणास प्रोत्साहन देणे. 
  • सुसंस्कृत, राष्ट्राभिमानी व्यक्तिमत्त्व घडवून त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणे. 
  • पर्यावरण व ई-वेस्ट बाबत जागरूकता वाढवणे, वाचनाची आवड निर्माण करणे.
  • स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम करून त्यासाठी मार्गदर्शन करणे.

आम्ही सर्वोत्तम का आहोत?

उत्कृष्ट शैक्षणिक घटक

शाळेतील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आव्हानात्मक बनवण्यासाठी , त्यांच्यामध्ये असलेल्या क्षमतांना प्राप्त करण्याकरिता आणि त्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेला आहे.

अनुभवी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी

शाळेतील प्रत्येक घटक उत्साही, तंत्रस्नेही, उच्चविद्याविभूषित असून प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहेत.

अत्याधुनिक सुविधा

शाळेचा आधुनिक परिसर शिक्षणासाठी पोषक असून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी परिपूर्ण वातावरण मिळण्यास त्यामुळे मदत होते.

पालकांच्या शाळेबद्दलच्या प्रतिक्रिया