सौ. वासंती बनकर
मुख्याध्यापक
नमस्कार !डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय हे गोळवलकर गुरुजींचे आदर्श सतत डोळ्यासमोर ठेऊन विद्यार्थ्यांमध्ये आदर्शांची रुजवणूक करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असते.विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी व बौद्धिक , शारीरिक, मानसिक संतुलन साधण्यासाठी दररोज घेतले जाणारे परिपाठ, नीतिमूल्य शिक्षणास दिलेले प्राधान्य हे विद्यार्थ्यांमध्ये सतत प्रतिबिंबित होत असतात.नियमित अभ्यासक्रमा व्यतिरिक्त शाळेमध्ये विविध संस्थांकडून राबवले जाणारे विशेष उपक्रम, कृतिसत्रे, कार्यशाळा, व्याख्याने व नेतृत्व गुण विकसित करण्याकरिता केलेले प्रयत्न हे शाळेच्या प्रगतीचा आलेख सांगतो. Co-education देणारी पुण्याच्या मध्यवर्ती भागातील आणि संपूर्ण पुणे शहरातच नव्हे तर महाराष्ट्रातही नावाजलेली मराठी माध्यमाची शाळा म्हणजे गोळवलकर गुरुजी विद्यालय. इंग्रजी माध्यमाचे सर्वत्र पेव फुटलेले असतानाही शैक्षणिक दर्जा टिकवून ठेवत आपल्या वेगळेपणाने स्वतःची ओळख निर्माण केली अशी ही शाळा. मराठी माध्यमातून शिक्षण घेतले तरी सुद्धा परदेशातही स्वतःचा ठसा उमटवत असताना आपले विद्यार्थी कोठेच मागे पडत नाहीत. अनेक माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहेत. स्वयं अर्थसहाय्यित तत्त्वावरील शाळा असूनही इथे प्रवेशासाठी रांगा लागलेल्या असतात यातच शाळेचे यश आहे असे मला वाटते.