काय वाईट याची माहिती विद्यार्थ्यांना अगदी लहान वयापासूनच दिली जाते. वर्षभर होणाऱ्या विविध स्पर्धा स्पर्धा उदा. गीतगायन, वक्तृत्व, नितधलेखन क्रीडा या सर्वामुळे एक प्रत्येक विद्यार्थी घडत जातो शिक्षकांचे चांगले संस्कार मुले आपोआप घेत राहतात आणि भविष्यात चांगला नागरिक होण्याचा प्रयन्त करतात. प्रशालेच्या असंख्य ऋणातून आम्हाला जेवढी उत्तराई करता येईल त्याचा आम्ही आतोनात प्रयन्त करू हि ग्वाही. अशीच आमच्या प्रशालेची उत्तमोत्तम प्रगती व्हाव्ही , हीच मनोमन सदिच्छा
हिरण्याचा म्हणजे माझ्या मुलीचा छोट्या गटापासून ते आत्ता 9वी पर्यंतचा आमचा पालक म्हणून अनुभव आयुष्यभर न विसरण्यासारखा, अत्यंत समाधानी आहे आणि आनंदी आहे. काही विशेष आदर्श अनुभव असे आले ज्यामध्ये सर्व विश्वस्त, सर्व स्टाफ आणि आदरणीय सर्व शिक्षकवृंद यांचा माझ्यावरील पालक म्हणून विश्वास मी अनुभवला. पालक म्हणून मी आणि माझी पत्नी हा अनुभव कधी विसरू नाही शकणार. पालकांवर संपूर्ण विश्वास असणे हे फक्त पालकांच्या वर्तनावरून नाही तर विद्यार्थ्यांच्या वर्तनावरून ही विद्यार्थ्यांच्या गुणांवरून ही तपासले जाते हा अनुभव मी स्वतः चांगलाच घेतला. आज एका वर्षाच्यावेगळ्या अनुभवातून माझी मुलगी सुद्धा ते सर्वकाही विसरून पुन्हा जेंव्हा अभ्यासाला लागली तेंव्हा तिच्या मनातील शाळा पुन्हा तिला लाभली ह्या तिच्या समाधानी चेहऱ्याने आम्ही पालक म्हणून अधिक समाधानी झालो. माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय या शाळेतील माझ्या मुलीचे पहिले पाऊल हे आदरणीय श्रीमती धालेवडिकर ताईंच्या काळातले. त्यानंतर आदरणीय सौ.मंजुषा ताई आणि आता आदरणीय श्री. प्रसाद लागू सर व आदरणीय सौ. वासंती ताई बनकर. एकूणच सर्वच मुख्याध्यापकांचा, सर्व शिक्षकांचा एक आदर्श आणि प्रदीर्घ अनुभव मी व माझ्या पत्नीने आमच्या मुलीमुळे घेतला. अजूनही घेत आहोत. कधी विसरू नाही शकणार इतके प्रेम, इतका विश्वास, आदर आणि आधार सुद्धा मला पालक म्हणून गोळवलकर शाळेने वेळोवेळी दिला. संस्कृतीने परिपूर्ण अशा आदर्श शाळा आज टिकवणे हे मी माझे सामाजिक कर्तव्य समजतो. शाळेच्या पुढील सर्व प्रकारच्या उपक्रमामध्ये पूर्ण सहभागी व्ह्यायल अधिक प्रमाणात आवडेल या निमित्ताने ही इच्छा व्यक्त करतो. येणाऱ्या पिढीसाठी ही शाळा एक संस्कारक्षम विद्यापीठ आहे. माझ्या मुलीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मला माझ्या पत्नीला एवढच नाही तर माझ्या सर्वच मित्र मैत्रीणीना सुद्धा शाळे विषयी, सर्व शिक्षकांविषयी अत्यंतिक आदर, अभिमान आणि समाधान वाटते.
मा. स. गोळवळकर गुरुजी विद्यालयात पाल्याचा प्रवेश घेतल्यापासून गेल्या चार महिन्यामध्ये आम्हाला भावलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाळेतील शिस्त! घराबरोबर सर्वात जास्त वेळ मुले शाळेत व्यतीत करतात त्यामुळे तिथेही मुले आनंदी परंतु शिस्तबध्द वातावरणामध्ये आहेत याचा आनंद आहे. अभ्यासाबरोबरच शाळेमध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धामुळे मुलांना त्यांचे कलागुण सादरीकरणासाठी हक्काचे व्यासपीठ मिळते. त्यासाठी प्रशालेच्या शिक्षकांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मोलाचे वाटते. विद्यालयाची आतापर्यंत ची ओळख ही पारंपरिक व संस्कारांना धरून असलेली शाळा अशी आहे .