- Events /
- अत्याधुनिक संगणक कक्षाचे उद्घाटन
अत्याधुनिक संगणक कक्षाचे उद्घाटन
विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांच्या डिजिटल कौशल्यांचा विकास व्हावा आणि ज्ञानाच्या नव्या क्षितिजांशी त्यांची ओळख व्हावी, या उद्देशाने डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या माध्यमिक विभागामध्ये सुसज्ज व अत्याधुनिक संगणक कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या संगणक कक्षाचे उद्घाटन आज शालासमिती अध्यक्ष सन्माननीय श्री. मकरंद पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. नव्या संधींची दारे खुली करणाऱ्या या अभिनव उद्घाटनाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. वासंती बनकर आणि पूर्वप्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. अपर्णाताई यांच्या हस्ते संगणकावरील क्लिकद्वारे कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
सध्या या संगणक कक्षामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे संगणक उपलब्ध असून विद्यार्थ्यांना संगणक साक्षरतेबरोबरच डिजिटल जगातील विविध कौशल्ये आत्मसात करण्यासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे. या कक्षाची उभारणी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, त्यांच्यामध्ये डिजिटल कौशल्यांचा विकास घडवून आणणे आणि भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम बनविणे या उद्देशाने करण्यात आल्याचे मुख्याध्यापिका सौ. वासंती बनकर यांनी यावेळी सांगितले.
या कक्षातील सर्व संगणक प्रशालेला ॲन्सिस सॉफ्टवेअर प्रा.लि कंपनीच्या सीएसआर निधीतून उपलब्ध झाले असून, समाजोपयोगी उपक्रमांतून शिक्षण क्षेत्राला मिळालेल्या या योगदानाबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली. संगणक कक्षामध्ये संगणक शिक्षणाचे महत्त्व, डिजिटल साक्षरता आणि तंत्रज्ञानाचा विधायक वापर यांवर आधारित विविध माहितीपूर्ण व प्रेरणादायी पोस्टर्सही लावण्यात आली आहेत. मार्गदर्शन करताना श्री. मकरंद पाटील यांनी आजच्या डिजिटल युगात संगणक शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा केवळ वापरकर्ता न राहता त्याचा सर्जनशील आणि ज्ञानवर्धक उपयोग करणारा नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन या संगणक कक्षामध्ये लवकरच आणखी संगणकांची भर घालण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
कार्यक्रम
-
भोंडला कार्यक्रम
प्रशालेमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भोंडला कार्य ... Read More
-
शारदीय नवरात्रोत्सव ...
शाळेमध्ये नवरात्रीच्या पावन पर्वाचे औच ... Read More
-
'सायबर सुरक्षा आणि ज ...
आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा व ... Read More
-
भौतिकशास्त्र कार्यशा ...
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हाव ... Read More
-
जलशुद्धीकरण आणि सांड ...
अभ्यासक्रमातील घटकाशी संबंधित विषयाचे प्रत्यक्ष ... Read More