प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • जलशुद्धीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्राला इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

जलशुद्धीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्राला इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

जलशुद्धीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्राला इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

अभ्यासक्रमातील घटकाशी संबंधित विषयाचे प्रत्यक्ष ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे, तसेच पुस्तकी ज्ञानाची तंत्रज्ञानाशी सांगड घालता यावी, या उद्देशाने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची पर्वती जलशुद्धीकरण केंद्र  आणि  दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राजाराम पुलावरील सांडपाणी प्रक्रिया केंद्र येथे क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती.
या क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी पर्वती जलशुद्धीकरण केंद्रामध्ये  खडकवासला इथून येणाऱ्या पाण्यावर कशाप्रकारे प्रक्रिया होवून ते घराघरांत पोहोचवले जाते याची तर राजाराम पुलावरील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात शहरातून विविध भागातून  गोळा होणाऱ्या घरगुती टाकाऊ व दूषित पाण्यावर प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते, याची प्रत्यक्ष माहिती घेतली. दोन्ही केंद्रातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शुद्धीकरणाच्या विविध टप्प्यांची सविस्तर माहिती दिली. सांडपाण्यातील घनकचरा, अशुद्धी आणि इतर घटक वेगळे करण्यापासून ते विविध वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रक्रियांद्वारे पाण्याचे शुद्धीकरण करण्यापर्यंतच्या प्रक्रियेचे विद्यार्थ्यांनी निरीक्षण केले. पाण्याचा पुनर्वापर आणि जलसंधारणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना या भेटीतून समजले.
केवळ पाठ्यपुस्तकातील माहिती न घेता प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन प्रक्रिया समजून घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली. ‘अनुभवातून शिक्षण’ या उद्देशाने आयोजित केलेल्या या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, जलव्यवस्थापन आणि पाण्याच्या पुनर्वापराचे महत्त्व अधिक प्रभावीपणे समजले. मुख्याध्यापिका वासंती बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान शिक्षिका सोनल एरंडे आणि श्रद्धा साळवेकर यांनी उपक्रमाला मूर्त स्वरूप दिले. या क्षेत्रभेटीमुळे पुस्तकी ज्ञानाची प्रत्यक्ष तंत्रज्ञानाशी जोडणी झाली असून, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पर्यावरणाविषयीची जबाबदारी निर्माण होण्यास निश्चितच मदत झाली.

कार्यक्रम

  • भोंडला कार्यक्रम

    भोंडला कार्यक्रम

    प्रशालेमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भोंडला कार्य ... Read More

  • शारदीय नवरात्रोत्सव निमित्त नवदुर्गा सन्मान विशेष कार्यक्रम

    शारदीय नवरात्रोत्सव ...

    शाळेमध्ये नवरात्रीच्या पावन पर्वाचे औच ... Read More

  • 'सायबर सुरक्षा आणि जागृती' (Cyber Security & Awareness) या विषयावर विशेष व्याख्यान

    'सायबर सुरक्षा आणि ज ...

    आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा व ... Read More

  • भौतिकशास्त्र कार्यशाळा

    भौतिकशास्त्र कार्यशा ...

    विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हाव ... Read More

  • जलशुद्धीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्राला इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

    जलशुद्धीकरण आणि सांड ...

    अभ्यासक्रमातील घटकाशी संबंधित विषयाचे प्रत्यक्ष ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स