प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • 'सायबर सुरक्षा आणि जागृती' (Cyber Security & Awareness) या विषयावर विशेष व्याख्यान

'सायबर सुरक्षा आणि जागृती' (Cyber Security & Awareness) या विषयावर विशेष व्याख्यान

'सायबर सुरक्षा आणि जागृती' (Cyber Security & Awareness) या विषयावर विशेष व्याख्यान

आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करताना विद्यार्थ्यांची सुरक्षितता राखणे अत्यंत गरजेचे आहे. याच उद्देशाने आमच्या प्रशालेमध्ये 'सायबर सुरक्षा आणि जागृती' (Cyber Security & Awareness) या विषयावर एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आहान फाउंडेशनतर्फे कल्याणी दशपुत्रे आणि नावेद शेख यांनी सायबर सुरक्षा म्हणजे काय याचे मार्गदर्शन केले. इंटरनेट, संगणक, मोबाईल आणि डिजिटल डेटा अनधिकृत प्रवेश किंवा हॅकिंगपासून सुरक्षित ठेवणे म्हणजे सायबर सुरक्षा होय. सायबर धोक्यांचे प्रकार: त्यांनी विद्यार्थ्यांना सध्या घडणाऱ्या विविध सायबर गुन्ह्यांची माहिती दिली.फिशिंग म्हणजे खोटे ई-मेल किंवा मेसेज पाठवून बँकेची आणि वैयक्तिक माहिती चोरणे. सोशल मीडिया फ्रॉड कसे होतात खोटे अकाउंट्स तयार करणे, सायबर बुलिंग (Cyber Bullying) आणि ऑनलाईन फसवणूक याविषयी अनमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सर्व अकाउंट्ससाठी नेहमी 'स्ट्रॉन्ग पासवर्ड' (Strong Password) ठेवावा आणि तो कोणाशीही शेअर करू नये.मोबाईल आणि सोशल मीडिया अकाउंट्सवर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2-Step Verification) सुरू ठेवावे. अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या लिंक्स (Links) किंवा फाईल्सवर क्लिक करू नये.सार्वजनिक वाय-फाय (Public Wi-Fi) वापरताना बँकिंग व्यवहार टाळावेत हे सर्व सांगितले.

व्याख्यानाच्या शेवटच्या सत्रात विद्यार्थ्यांनी मार्गदर्शकांना सायबर सुरक्षिततेविषयी अनेक प्रश्न विचारले. उदा. "ऑनलाईन गेमिंग दरम्यान होणारी फसवणूक कशी टाळावी?" किंवा "अकाउंट हॅक झाल्यास काय करावे?". सर्व शंकांचे अत्यंत समाधानकारक निरसन केले. तसेच, कोणतीही सायबर फसवणूक झाल्यास त्वरित '1930' या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवर किंवा Cyber Crime Official Portal वर तक्रार नोंदवण्याचे आवाहन त्यांनी केले. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुरक्षित आणि जबाबदार वापर कसा करावा, याची सविस्तर माहिती मिळाली.

कार्यक्रम

  • भोंडला कार्यक्रम

    भोंडला कार्यक्रम

    प्रशालेमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भोंडला कार्य ... Read More

  • शारदीय नवरात्रोत्सव निमित्त नवदुर्गा सन्मान विशेष कार्यक्रम

    शारदीय नवरात्रोत्सव ...

    शाळेमध्ये नवरात्रीच्या पावन पर्वाचे औच ... Read More

  • 'सायबर सुरक्षा आणि जागृती' (Cyber Security & Awareness) या विषयावर विशेष व्याख्यान

    'सायबर सुरक्षा आणि ज ...

    आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा व ... Read More

  • भौतिकशास्त्र कार्यशाळा

    भौतिकशास्त्र कार्यशा ...

    विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हाव ... Read More

  • जलशुद्धीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्राला इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

    जलशुद्धीकरण आणि सांड ...

    अभ्यासक्रमातील घटकाशी संबंधित विषयाचे प्रत्यक्ष ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स