प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • शारदीय नवरात्रोत्सव निमित्त नवदुर्गा सन्मान विशेष कार्यक्रम

शारदीय नवरात्रोत्सव निमित्त नवदुर्गा सन्मान विशेष कार्यक्रम

शारदीय नवरात्रोत्सव निमित्त नवदुर्गा सन्मान विशेष कार्यक्रम

शाळेमध्ये नवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी 'नवदुर्गा सन्मान' या विशेष कार्यक्रमाचे दिनांक 14 ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सुमधुर सरस्वती वंदन सादर केले.

आजच्या आधुनिक युगात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. विद्यार्थ्यांमध्ये महिलांविषयी आदराची भावना निर्माण व्हावी आणि या कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षमय प्रवासातून विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना, आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा मिळावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश प्रशालेच्या मा. मुख्याध्यापिका सौ. वासंती ताईंनी आपल्या प्रास्ताविकेतून दिला.

या सोहळ्यात समाज, कला, क्रीडा, शिक्षण, विज्ञान, उद्योग, वैद्यकीय, संरक्षण आणि पर्यावरण या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नऊ कर्तृत्ववान महिलांचा शाळेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. सौ. श्रद्धा ताईंनी प्रत्येक महिला अतिथीचा परिचय विद्यार्थ्यांसमोर करून दिला. शाळेचे शाळा समिती अध्यक्ष मा. श्री. मकरंद पाटील सरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन या 'नवदुर्गांचा' गौरव करण्यात आला.

सत्कार सोहळ्यानंतर सन्मानित महिलांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या क्षेत्रातील अनुभव, आव्हाने आणि यशाची गाथा मांडली. त्यांनी विद्यार्थ्यांना भरपूर वाचन करावे व वाचलेल्या माहितीचे ज्ञानात रुपांतर करण्याचे आवाहन केले. समाजातील तरुण पिढीने स्वमनाने तयारी दाखविली तर ते व्यासाधिनतेपासून मुक्त होऊ शकतात यावर त्यांनी प्रकाश टाकला.

शाळेचे अध्यक्ष मा. मकरंद पाटील सरांनी आपल्या भाषणात सर्व सत्कारमूर्तींचे अभिनंदन केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षिका सौ. मधुरा ताईंनी सूत्रसंचालन केले व सौ. नीलिमा ताईंनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप कल्याण मंत्राने झाला.

कार्यक्रम

  • भोंडला कार्यक्रम

    भोंडला कार्यक्रम

    प्रशालेमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भोंडला कार्य ... Read More

  • शारदीय नवरात्रोत्सव निमित्त नवदुर्गा सन्मान विशेष कार्यक्रम

    शारदीय नवरात्रोत्सव ...

    शाळेमध्ये नवरात्रीच्या पावन पर्वाचे औच ... Read More

  • 'सायबर सुरक्षा आणि जागृती' (Cyber Security & Awareness) या विषयावर विशेष व्याख्यान

    'सायबर सुरक्षा आणि ज ...

    आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा व ... Read More

  • भौतिकशास्त्र कार्यशाळा

    भौतिकशास्त्र कार्यशा ...

    विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हाव ... Read More

  • जलशुद्धीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्राला इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

    जलशुद्धीकरण आणि सांड ...

    अभ्यासक्रमातील घटकाशी संबंधित विषयाचे प्रत्यक्ष ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स