- Events /
- भौतिकशास्त्र कार्यशाळा
भौतिकशास्त्र कार्यशाळा
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन त्यांना संकल्पना स्पष्ट व्हाव्यात, या उद्देशाने प्रशालेत भौतिकशास्त्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून श्री. ऋषिकेश विभुते लाभले होते. त्यांनी भौतिकशास्त्रातील क्लिष्ट संज्ञा, तत्वे आणि नियम अतिशय सोप्या पद्धतीने हँड्स-ऑन ऍक्टिव्हिटी (प्रत्यक्ष कृती) च्या माध्यमातून स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला. या प्रयोगांच्या निरीक्षणावर आधारित प्रश्नोत्तरे विद्यार्थ्यांकडून लिहून घेण्यात आली आणि त्यामागील वैज्ञानिक कारणे ऋषिकेश सरांनी विद्यार्थ्यांना अत्यंत रंजकतेने समजावून सांगितली.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून शिकणे हे शिक्षणात सर्वात महत्त्वाचे मानले जाते, हाच दृष्टिकोन या संपूर्ण कार्यशाळेत ठेवण्यात आला होता. विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व कळावे यासाठी त्यांच्या दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणांचा वापर करून वैज्ञानिक संकल्पना समजावून सांगण्यात आल्या. रोजच्या जगण्यातील गोष्टींमागे दडलेले भौतिकशास्त्राचे नियम समजल्यामुळे विद्यार्थ्यांचा विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. पाठांतरापेक्षा स्वतः अनुभव घेऊन शिकल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती वाढीस लागली असून, हा उपक्रम त्यांच्यासाठी अत्यंत आनंददायी आणि फलदायी ठरला.
कार्यक्रम
-
भोंडला कार्यक्रम
प्रशालेमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भोंडला कार्य ... Read More
-
शारदीय नवरात्रोत्सव ...
शाळेमध्ये नवरात्रीच्या पावन पर्वाचे औच ... Read More
-
'सायबर सुरक्षा आणि ज ...
आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा व ... Read More
-
भौतिकशास्त्र कार्यशा ...
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हाव ... Read More
-
जलशुद्धीकरण आणि सांड ...
अभ्यासक्रमातील घटकाशी संबंधित विषयाचे प्रत्यक्ष ... Read More