प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयात कागदविरहीत विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक

गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयात कागदविरहीत विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक

गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयात कागदविरहीत विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक

 लोकशाहीला पोषक असणारे धडे शालेय वयातच मुलांना  दिल्यास सुदृढ समाज घडण्यास मदत होते. याच उद्देशाने टिळक पथावरील मा. स. गोळवलकर गुरुजी माध्यमिक विभागात प्रत्यक्ष निवडणूकीचा अनुभव विदयार्थ्यांना देण्यात आला. या निवडणुकीत विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून चि.शार्दूल संत याची निवड झाली. तर विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून कु. अग्रणी साठे हिची निवड झाली. विद्यार्थी उपप्रतिनिधी म्हणून चि.अथर्व गौतम तर  कु.आर्या फडके हिची विद्यार्थिनी उपप्रतिनिधी म्हणून निवड झाली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. वासंतीताई यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडली.  

या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्णतः ‘कागदविरहीत’ घेण्यात आली. लॅपटॉपवर ‘डिजिटल’मतपत्रिका तयार करण्यात आली होती. विद्यार्थी-मतदारांनी ‘क्लिक’ करून मत नोंदवले. सौ.निलिमाताई यांनी या कामी जबाबदारी सांभाळली होती. आठवी आणि दहावीच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात निवडणूक प्रक्रियेचा समावेश असल्याने विदयार्थ्यांना याची माहिती व्हावी यासाठी ३ आणि ४ जुलै या दिवशी निवडणूकीचे आयोजन करण्यात आले होते. आठवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण माहिती सौ. प्रियाताई आणि श्री.सुभाष निंबाळकर सर यांनी दिली आणि त्यानंतर इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांकडून सौ.सोनलताई आणि सौ.मधुराताई यांनी इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून घेतले. त्यानंतर सौ.दीप्तीताई आणि श्री.सुभाष निंबाळकर सर यांनी अर्जाची छाननी केली. विद्यार्थी उमेदवार असल्याने अर्जांची छाननी करताना अगदी बारीक-सारीक गोष्टी तपासण्यात आल्या आणि त्यामाध्यमातून उमेदवारीसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे घोषित करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रचार करण्यासाठी वेळ देण्यात आला. प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांनी निवडणुकीचा प्रचार केला त्यामुळे निवडणुकीसाठी पोषक वातावरण प्रशालेत निर्माण झाले होते. प्रचार होत असताना आचारसंहितेचे पालन होत आहे की नाही यावर श्री. निंबाळकर सर लक्ष ठेवून होते.   

 सौ.प्रियाताई यांनी विद्यार्थी-उमेदवारांसाठी निवडणूक चिन्हे तयार केली आणि त्यातून ‘लकी ड्रॉ’ पद्धतीने चिन्हांचे वाटप करण्यात आले.  ४ जुलैला प्रत्यक्ष मतदानाचे आयोजन करण्यात आले. यासाठी विद्यार्थ्यांना वर्गाप्रमाणे मतदान कक्षात सोडणे, प्रत्येक मतदाराच्या बोटाला शाई लावणे, तसेच मतदान शांततेमध्ये पार पाडणे ही सर्व कामे शिक्षकांना वाटून देण्यात आली होती. विद्यार्थी-मतदारांच्या सह्या घेणे आणि त्यांच्या बोटांना शाई लावणे ही कामे सौ. प्रियाताई शेठ , सौ. संध्यामावशी , श्री.प्रसादकाका आणि श्री.सुनीलकाका यांनी यथायोग्य पार पाडली. मतदानासाठी बूथ तयार करण्याचे काम सौ. मीनलताई आणि सौ.श्रद्धाताई यांनी पार पाडले. ‘विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकीबाबत’ च्या अनुषंगाने फलक लेखनाचे काम सौ. सोनलताई आणि सौ. श्रद्धाताई यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केले होते. सर्व विद्यार्थ्यांचे मतदान करून झाल्यानंतर ज्येष्ठ शिक्षक श्री. अक्षय कुलकर्णी यांनी मतमोजणी केली आणि निकाल घोषित करण्यात आला.  या निवडणुकीद्वारे लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाच्या गोष्टींची अनुभूती सर्व विदयार्थ्यांना मिळाली. मुलांनी सर्व नियमांचे पालन करून शांततेत निवडणूकीचा आनंद घेतला. 

कार्यक्रम

  • भोंडला कार्यक्रम

    भोंडला कार्यक्रम

    प्रशालेमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भोंडला कार्य ... Read More

  • शारदीय नवरात्रोत्सव निमित्त नवदुर्गा सन्मान विशेष कार्यक्रम

    शारदीय नवरात्रोत्सव ...

    शाळेमध्ये नवरात्रीच्या पावन पर्वाचे औच ... Read More

  • 'सायबर सुरक्षा आणि जागृती' (Cyber Security & Awareness) या विषयावर विशेष व्याख्यान

    'सायबर सुरक्षा आणि ज ...

    आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा व ... Read More

  • भौतिकशास्त्र कार्यशाळा

    भौतिकशास्त्र कार्यशा ...

    विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हाव ... Read More

  • जलशुद्धीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्राला इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

    जलशुद्धीकरण आणि सांड ...

    अभ्यासक्रमातील घटकाशी संबंधित विषयाचे प्रत्यक्ष ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स