- Events /
- गोळवलकर गुरुजी विद्यालयाची दिल्ली–आग्रा–फतेहपूर सिक्री शैक्षणिक सहल 2025
गोळवलकर गुरुजी विद्यालयाची दिल्ली–आग्रा–फतेहपूर सिक्री शैक्षणिक सहल 2025
आपल्या विद्यालयाने यावर्षी विद्यार्थ्यांसाठी दिल्ली–आग्रा–फतेहपूर सिक्री शैक्षणिक सहलीचे 2 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर यादरम्यान आयोजन केले होते. ही सहल विद्यार्थ्यांसाठी केवळ मनोरंजनाची नव्हे, तर ज्ञान आणि अनुभवांची खाण ठरली.
सहल आग्र्यापासून सुरू झाली. विद्यार्थ्यांनी भारताच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असलेल्या ताजमहालला भेट दिली. त्यानंतर फतेहपूर सिक्रीतील पंचमहल, बुलंद दरवाजा, जोधाबाई पॅलेस, सामोसा महल, आणि दिवान-ए-खास या अद्भुत स्थळांना भेट देण्यात आली. येथील वास्तुकलेचे सौंदर्य आणि ऐतिहासिक माहिती ऐकताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील कुतूहल दिसून येत होते.
यानंतर सहल दिल्लीकडे वळली. येथे विद्यार्थ्यांनी इंडिया गेट, राष्ट्रपती भवन, तसेच आधुनिक विज्ञानाचे दर्शन घडवणाऱ्या सायन्स म्युझियम सेंटरला भेट दिली. राष्ट्रपती भवन इथं नुकताच विश्वचषक उंचावलेल्या भारतीय महिला संघातील खेळाडूंचे दुरून का होईना झालेले दर्शन विद्यार्थी आणि विद्यार्थीनीना आनंद देऊन गेले. संध्याकाळी सर्वांनी अक्षरधाम मंदिरातील भव्य साउंड अँड लाईट शो पाहिला. त्या मनमोहक प्रकाशयोजनांनी आणि संस्कृतीच्या दर्शनाने सर्वांच्या मनात भारतीय संस्कृतीबद्दल अभिमानाची भावना दाटून आली.
संपूर्ण प्रवासात विद्यार्थ्यांनी भरपूर एन्जॉय केले. त्यांच्यासाठी रुचकर जेवण आणि नाश्त्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. प्रवासासाठी एसी बसेस असल्याने सर्वांचा प्रवास आरामदायी झाला. या यशस्वी सहलीमागे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. वासंतीताई, शिक्षिका सौ. प्रियाताई, सौ. मधुराताई, तसेच शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ. कविता धर्माधिकारी, शिक्षक श्री. सुभाष निंबाळकर आणि सेवक श्री. प्रसाद राजेशिर्के यांचे मोठे परिश्रम आहेत. संपूर्ण सहलीचे उत्कृष्ट नियोजन शुभम एज्युकेशनल टूर्स यांनी केले. त्यांच्या सहकार्यामुळे ही सहल संस्मरणीय आणि सुरळीत पार पडली.
या सहलीमुळे विद्यार्थ्यांना भारताच्या ऐतिहासिक वारशाचे, सांस्कृतिक वैभवाचे आणि वैज्ञानिक प्रगतीचे प्रत्यक्ष दर्शन घडले. त्यामुळे त्यांची ज्ञानसंपदा समृद्ध झाली आणि त्यांच्या मनात देशाबद्दल अभिमान निर्माण झाला. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव ठरलेली ही सहल त्यांना सदैव लक्षात राहील.
कार्यक्रम
-
भोंडला कार्यक्रम
प्रशालेमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भोंडला कार्य ... Read More
-
शारदीय नवरात्रोत्सव ...
शाळेमध्ये नवरात्रीच्या पावन पर्वाचे औच ... Read More
-
'सायबर सुरक्षा आणि ज ...
आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा व ... Read More
-
भौतिकशास्त्र कार्यशा ...
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हाव ... Read More
-
जलशुद्धीकरण आणि सांड ...
अभ्यासक्रमातील घटकाशी संबंधित विषयाचे प्रत्यक्ष ... Read More