- Events /
- गोळवलकर गुरुजी विद्यालयात डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा संस्थापक दिन उत्साहात साजरा
गोळवलकर गुरुजी विद्यालयात डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा संस्थापक दिन उत्साहात साजरा
पुणे, दिनांक ९ ऑगस्ट २०२६ : गेल्या १४० हून अधिक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा संस्थापक दिन माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी, वामन शिवराम आपटे आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले. थोर संस्थापकांनी राष्ट्रनिष्ठ, स्वाभिमानी आणि विवेकी पिढी घडविण्यासाठी केलेल्या कार्याचे यावेळी स्मरण करण्यात आले. संस्थेच्या नियामक परिषदेच्या सदस्य मा. डॉ. प्रीती अभ्यंकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्राजक्ताताई यांनी ईशस्तवन सादर केले.
अभ्यंकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्रशालेने विद्यार्थ्यांना दिलेली मूल्ये जपत त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल करावी, असे आवाहन केले. संस्थापकांनी निर्माण केलेल्या शैक्षणिक परंपरेचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारावी, असेही त्यांनी सांगितले. माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वासंती बनकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रसाद लागू, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अपर्णा साने, शिक्षक, विद्यार्थी व अन्य मान्यवर उपस्थित होते. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रसाद लागू यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
‘शिक्षण विवेक’च्या १४ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ऑगस्ट महिन्याच्या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर विविध स्पर्धा आणि परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीसे देवून त्यांना गौरवण्यात आले. प्रशालेतील शिक्षिका सोनल एरंडे आणि मीनल एरंडे यांनी एम.एड. पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
शिक्षिका प्रियाताई यांनी सूत्रसंचालन केले तर रूपालीताईंनी आभार मानले. संस्थापकांच्या कार्याचे स्मरण, विद्यार्थ्यांचे यश आणि शिक्षकांचा गौरव यामुळे संस्थापक दिनाचा हा सोहळा प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला.
कार्यक्रम
-
भोंडला कार्यक्रम
प्रशालेमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भोंडला कार्य ... Read More
-
शारदीय नवरात्रोत्सव ...
शाळेमध्ये नवरात्रीच्या पावन पर्वाचे औच ... Read More
-
'सायबर सुरक्षा आणि ज ...
आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा व ... Read More
-
भौतिकशास्त्र कार्यशा ...
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हाव ... Read More
-
जलशुद्धीकरण आणि सांड ...
अभ्यासक्रमातील घटकाशी संबंधित विषयाचे प्रत्यक्ष ... Read More