- Events /
- गोळवलकर गुरुजी विद्यालयात *ऋषिपंचमी निमित्त डॉ. केशव गिंडे आणि जयंत फडके यांचा सन्मान
गोळवलकर गुरुजी विद्यालयात *ऋषिपंचमी निमित्त डॉ. केशव गिंडे आणि जयंत फडके यांचा सन्मान
माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयात ऋषिपंचमीच्या निमित्ताने एक विशेष कार्यक्रम २८ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रख्यात बासरीवादक आणि केशववेणू या जगप्रसिद्ध बासरीचे जनक डॉ. पंडित केशव गिंडे गुरुजी तसेच ज्येष्ठ ब्रह्मविद्या साधक जयंत फडके यांचा शाल, श्रीफळ, रोखक्कम आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. आर्या फडके आणि अग्रणी साठे या विद्यार्थिनींनी दोन्ही मान्यवरांचे पाद्यपूजन करून कृतज्ञता व्यक्त केली. तत्पूर्वी डॉ. पंडित केशव गिंडे , जयंत फडके , मिलिंद कांबळे आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं.
सन्मानानंतर बोलताना डॉ. गिंडे म्हणाले, “संगीत हे केवळ कला नसून साधना आहे. बासरी ही संगीताचा श्वास आहे. जसा श्वास शुद्ध तसं मन शुद्ध, आणि मन शुद्ध झालं की व्यक्तिमत्त्व आपोआप तेजस्वी होतं.” यावेळी गिंडे गुरुजी यांनी बासरीचे विविध प्रकार विद्यार्थ्यांना दाखवले तसेच थेट प्रात्यक्षिकातून रागांची ओळख करून दिली. त्यांच्या सुरेल वादनाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले.
यावेळी प्रेरणादायी विचार व्यक्त करताना जयंत फडके म्हणाले, “ जो श्वासावर नियंत्रण मिळवतो, तो जीवनातील अनेक गोष्टींवर नियंत्रण मिळवतो. आत्मसंयम आणि साधना यांच्यामुळेच खरे यश प्राप्त होते”, असं सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना श्वासाचे महत्त्व समजावले.
या कार्यक्रमाबाबत शाळा समिती अध्यक्ष मिलिंद कांबळे म्हणाले, “विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच संस्कार आणि प्रेरणा मिळावी हा या कार्यक्रमामागील उद्देश आहे. अशा कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या मनावर चिरस्थायी ठसा उमटतो.” “ऋषींच्या स्मरणाचा दिवस शाळेत साजरा करताना ऋषितुल्य व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्याची आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांना आज मिळालेली ही प्रेरणा त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी दीपस्तंभ ठरेल ” अशा भावना मुख्याध्यापिका वासंती बनकर यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केल्या.
विद्यार्थी प्रतिनिधी शार्दुल संत याने प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, “गुरुजींचे बासरी वादन प्रत्यक्ष ऐकण्याचा हा अनोखा अनुभव आम्हाला खूप आनंददायी होता. तसेच फडके सरांच्या विचारांनी श्वास आणि आत्मसंयमाचे महत्त्व अधिक स्पष्ट झाले.”
प्रशालेच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अपर्णा साने यावेळी उपस्थित होत्या. प्रिया जोशी यांनी सूत्रसंचालन केले. सौ.मधुरा बापट लिखित सन्मानपत्राचे ज्येष्ठ शिक्षक श्री. अक्षय कुलकर्णी यांनी वाचन केले. सौ. सोनल एरंडे , सौ.दीप्ती यादव , सौ.निलिमा केदारी यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवर्ग, पालक प्रतिनिधी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ऋषिपंचमीचे औचित्य साधून पार पडलेला हा सोहळा सर्व उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला.
कार्यक्रम
-
भोंडला कार्यक्रम
प्रशालेमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भोंडला कार्य ... Read More
-
शारदीय नवरात्रोत्सव ...
शाळेमध्ये नवरात्रीच्या पावन पर्वाचे औच ... Read More
-
'सायबर सुरक्षा आणि ज ...
आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा व ... Read More
-
भौतिकशास्त्र कार्यशा ...
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हाव ... Read More
-
जलशुद्धीकरण आणि सांड ...
अभ्यासक्रमातील घटकाशी संबंधित विषयाचे प्रत्यक्ष ... Read More