प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • गोळवलकर गुरुजी विद्यालयात दहीहंडीचा उत्साह, विद्यार्थ्यांचा जल्लोष

गोळवलकर गुरुजी विद्यालयात दहीहंडीचा उत्साह, विद्यार्थ्यांचा जल्लोष

गोळवलकर गुरुजी विद्यालयात दहीहंडीचा उत्साह, विद्यार्थ्यांचा जल्लोष

आपल्या शाळेत 28 ऑगस्ट रोजी दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. विद्यार्थी, शिक्षक यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला विशेष शोभा आली. पारंपरिक वेशभूषेत आलेले गोविंदा आणि त्यांच्या साथीदारांनी रचलेले मानवी मनोरे हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.   

सकाळपासूनच शाळेच्या पटांगणात उत्सवाचे वातावरण होते. मध्यावर एका उंच ठिकाणी दहीहंडी बांधण्यात आली होती. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वासंतीताई यावेळी दहीहंडी या उत्सवाबाबत आपल्या भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या, "दहीहंडी हा केवळ एक सण नसून तो आपल्याला संघटन आणि एकजुटीचे महत्त्व शिकवतो. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील आनंदी आणि उत्साही क्षणांचे स्मरण करून देणारा हा उत्सव विद्यार्थ्यांच्या मनात नवचैतन्य निर्माण करतो."  

त्यानंतर, शाळेच्या वेगवेगळ्या इयत्तांमधील विद्यार्थ्यांनी आपापले 'गोविंदा पथक' तयार करून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. 'गोविंदा रे गोपाळा' आणि 'जय श्री कृष्ण' च्या गजरात विद्यार्थ्यांनी एकावर एक थर रचत मानवी मनोरे तयार केले. रिमझिम पावसात दहीहंडी फुटताच सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि जल्लोषात गोविंदांचे कौतुक केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना काला देण्यात आला.   

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका सौ. दीप्ती यादव, सौ.प्रिया जोशी, सौ निलिमा केदारी आणि श्री.सुभाष निंबाळकर सेवक श्री प्रसाद राजेशिर्के, सौ.संध्या दुरुंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचीही योग्य ती काळजी घेण्यात आली होती. या कार्यक्रमानिमित्त शाळेत दिवसभर उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते. 

कार्यक्रम

  • भोंडला कार्यक्रम

    भोंडला कार्यक्रम

    प्रशालेमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भोंडला कार्य ... Read More

  • शारदीय नवरात्रोत्सव निमित्त नवदुर्गा सन्मान विशेष कार्यक्रम

    शारदीय नवरात्रोत्सव ...

    शाळेमध्ये नवरात्रीच्या पावन पर्वाचे औच ... Read More

  • 'सायबर सुरक्षा आणि जागृती' (Cyber Security & Awareness) या विषयावर विशेष व्याख्यान

    'सायबर सुरक्षा आणि ज ...

    आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा व ... Read More

  • भौतिकशास्त्र कार्यशाळा

    भौतिकशास्त्र कार्यशा ...

    विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हाव ... Read More

  • जलशुद्धीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्राला इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

    जलशुद्धीकरण आणि सांड ...

    अभ्यासक्रमातील घटकाशी संबंधित विषयाचे प्रत्यक्ष ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स