प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • गुणवंतांचा दिमाखदार गौरव; गुणगौरव सोहळा उत्साहात

गुणवंतांचा दिमाखदार गौरव; गुणगौरव सोहळा उत्साहात

गुणवंतांचा दिमाखदार गौरव; गुणगौरव सोहळा उत्साहात

 डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गौरवार्थ आयोजित करण्यात आलेला ‘गुणगौरव समारंभ’ नुकताच उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सन्मान आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक व मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.  

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलन आणि सरस्वती वंदनेने झाली. विद्यालयाच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. वासंतीताई यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करत उपस्थित मान्यवर, पालक आणि विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यानंतर सौ. सोनलताई यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. अविनाश देशमुख यांचा परिचय करून दिला.  

सौ. श्रद्धाताई यांच्या प्रभावी सूत्रसंचालनाखाली मुख्य बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेत तब्बल १०० टक्के गुण प्राप्त करून विद्यालयाचा नावलौकिक वाढविणारी विद्यार्थिनी कु. ओजसी ओगले हिचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी ओजसीने आपल्या यशाचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडत अभ्यासातील सातत्य, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षकांनी वर्गात सांगितलेल्या गोष्टींचे पालन केल्यास अर्धे काम तिथेच होते अस तिने सांगितले. तिच्या प्रेरणादायी मनोगताने उपस्थित विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा मिळाली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. अविनाश देशमुख यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी मार्गदर्शन करताना कष्ट करा यश मिळेल असे सांगताना ध्येय निश्चिती, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास आणि जिद्द आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.  

यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळासमितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री. मकरंदजी पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतातून गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी यशाच्या शिखरावर पोहोचताना नम्रता, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी जपावी, असा संदेश देत खचून न जाता धैर्याने प्रत्येक गोष्टीला सामोरे जा असे सांगत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी पूर्वप्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. अपर्णाताई, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून बक्षिसे पुरस्कृत करणारे श्री. धनंजय पूरकर आणि कुलकर्णी कुटुंबीय उपस्थित होते. 

‘सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः...’ या कल्याणमंत्राने आणि प्रेरणादायी वातावरणात या संस्मरणीय गुणगौरव समारंभाची सांगता झाली. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करतानाच भविष्यातील वाटचालीसाठी प्रेरणा देणारा हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात कायम राहील. 

 

 

कार्यक्रम

  • भोंडला कार्यक्रम

    भोंडला कार्यक्रम

    प्रशालेमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भोंडला कार्य ... Read More

  • शारदीय नवरात्रोत्सव निमित्त नवदुर्गा सन्मान विशेष कार्यक्रम

    शारदीय नवरात्रोत्सव ...

    शाळेमध्ये नवरात्रीच्या पावन पर्वाचे औच ... Read More

  • 'सायबर सुरक्षा आणि जागृती' (Cyber Security & Awareness) या विषयावर विशेष व्याख्यान

    'सायबर सुरक्षा आणि ज ...

    आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा व ... Read More

  • भौतिकशास्त्र कार्यशाळा

    भौतिकशास्त्र कार्यशा ...

    विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हाव ... Read More

  • जलशुद्धीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्राला इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

    जलशुद्धीकरण आणि सांड ...

    अभ्यासक्रमातील घटकाशी संबंधित विषयाचे प्रत्यक्ष ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स