प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • जागतिक योग दिन उत्साहात साजरा

जागतिक योग दिन उत्साहात साजरा

जागतिक योग दिन उत्साहात साजरा

 भारतात उगम पावलेली ‘योग’ ही एक प्राचीन कला आहे. भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवी शरीराच्या मानसिक, बौद्धिक व शारीरिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे.
      दरवर्षी 21 जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जातो. आपल्या प्रशालेतही दिनांक 21 जून 2025 रोजी  शालेय ग्रंथालयात ‘योग दिन’ साजरा केला गेला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रशालेत प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. मनाली देव यांना आमंत्रित करण्यात आले होते. योगगुरु  डॉ. मनाली देव  यांच्या कार्याचा परिचय प्रशालेतील शिक्षक श्री. प्रशांत जाधव सर यांनी करून दिला.
          प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.वासंती ताई बनकर यांनी डॉ. मनाली देव यांना भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत केले. डॉ.मनाली देव यांनी प्रात्यक्षिकांद्वारे योगाचे महत्त्व पटवून दिले.
       या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील शिक्षिका सौ.मिनल ताई यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सुभाष सर यांनी केले.  या कार्यक्रमात आभार प्रदर्शन सौ.दीप्तीताई यांनी केले . तसेच कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सौ.श्रद्धा ताई व सौ.निलिमाताई यांनी विशेष मेहनत घेतली.

कार्यक्रम

  • भोंडला कार्यक्रम

    भोंडला कार्यक्रम

    प्रशालेमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भोंडला कार्य ... Read More

  • शारदीय नवरात्रोत्सव निमित्त नवदुर्गा सन्मान विशेष कार्यक्रम

    शारदीय नवरात्रोत्सव ...

    शाळेमध्ये नवरात्रीच्या पावन पर्वाचे औच ... Read More

  • 'सायबर सुरक्षा आणि जागृती' (Cyber Security & Awareness) या विषयावर विशेष व्याख्यान

    'सायबर सुरक्षा आणि ज ...

    आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा व ... Read More

  • भौतिकशास्त्र कार्यशाळा

    भौतिकशास्त्र कार्यशा ...

    विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हाव ... Read More

  • जलशुद्धीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्राला इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

    जलशुद्धीकरण आणि सांड ...

    अभ्यासक्रमातील घटकाशी संबंधित विषयाचे प्रत्यक्ष ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स