प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • नशामुक्ती मोहीम व्याख्यान 2026

नशामुक्ती मोहीम व्याख्यान 2026

नशामुक्ती मोहीम व्याख्यान 2026

 नशामुक्त भारत अभियान अंतर्गत प्रशालेत शपथविधी व प्रबोधन कार्यक्रम संपन्न 

दिनांक: ७ ऑगस्ट २०२६पुणे: प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने देशव्यापी 'नशामुक्त भारत अभियान' ६ ते २० ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून स्थानिक प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रबोधन आणि नशामुक्ती शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भावी पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवणे आणि त्यांच्यामध्ये व्यसनाधीनतेविरुद्ध जनजागृती निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या प्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित असलेल्या प्रजापिता ब्रह्मकुमारी रेश्मा महोदया यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या आणि प्रभावी भाषेत मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात खालील प्रमुख मुद्द्यांवर प्रकाश टाकला, अमली पदार्थांपासून दूर राहा, अमली पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी, कुटुंबासाठी आणि भविष्यासाठी कसे घातक आहे, विद्यार्थ्यांनी कोणत्याही मोहाला बळी न पडता अशा पदार्थांपासून आयुष्यभर दूर राहण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. सध्याच्या काळात केवळ अमली पदार्थच नव्हे, तर मोबाईल हे देखील एक मोठे मानसिक व्यसन बनत चालले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मोबाईलचा वापर ज्ञान आणि प्रगतीसाठी व्हावा, संवादातील अडथळा म्हणून नाही. सकारात्मक आणि संयमित वापर करावा, असे प्रतिपादन त्यांनी केले. मार्गदर्शनानंतर प्रशालेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सामूहिक नशामुक्ती शपथविधीचे आयोजन करण्यात आले. सर्वांनी अत्यंत उत्साहात आणि गांभीर्याने शपथ घेतली. 

 

कार्यक्रम

  • भोंडला कार्यक्रम

    भोंडला कार्यक्रम

    प्रशालेमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भोंडला कार्य ... Read More

  • शारदीय नवरात्रोत्सव निमित्त नवदुर्गा सन्मान विशेष कार्यक्रम

    शारदीय नवरात्रोत्सव ...

    शाळेमध्ये नवरात्रीच्या पावन पर्वाचे औच ... Read More

  • 'सायबर सुरक्षा आणि जागृती' (Cyber Security & Awareness) या विषयावर विशेष व्याख्यान

    'सायबर सुरक्षा आणि ज ...

    आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा व ... Read More

  • भौतिकशास्त्र कार्यशाळा

    भौतिकशास्त्र कार्यशा ...

    विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हाव ... Read More

  • जलशुद्धीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्राला इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

    जलशुद्धीकरण आणि सांड ...

    अभ्यासक्रमातील घटकाशी संबंधित विषयाचे प्रत्यक्ष ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स