- Events /
- नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा उत्साहपूर्ण प्रारंभ
नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा उत्साहपूर्ण प्रारंभ
नवीन शैक्षणिक २०२६-२७ वर्षाचा उत्साही प्रारंभ उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर, दिनांक १५ जून २०२६ रोजी माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय येथे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात झाली. नवीन इयत्तेची पुस्तके, नवा गणवेश आणि मित्रांना भेटण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. सकाळी ठीक ७:१५वाजता शाळेची पहिली घंटा वाजली आणि संपूर्ण परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने पुन्हा एकदा जिवंत झाला.अत्यंत उत्साहाने इयत्ता पहिली ते दहावीचे सर्व विद्यार्थी प्रार्थनेसाठी फरशीच्या मैदानावर जमा झाले होते. शाळेच्या पहिला दिवस असल्याने सर्वांची एकत्रित प्रार्थना व परिपाठ घेण्यात आला. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ वासंती बनकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची नीट काळजी घ्यावी त्यासाठी चौरस आहार घ्यावा असे सांगितले त्याचबरोबर या नवीन शैक्षणिक वर्षात एखादी नवीन गोष्ट शिकण्याचा संकल्प करण्यास सांगितला.इयत्ता पहिली ते दहावी वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांचा परिचय करून देण्यात आला. त्यानंतर इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी आपापल्या वर्गात गेले. ज्येष्ठ शिक्षक श्री प्रशांत जाधव सरांनी विद्यार्थ्यांना शिस्तीसंबंधी काही सूचना दिल्या. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवीन वर्ग, वेळापत्रक, शिकवणारे शिक्षक यासंबंधी असलेली उत्सुकता स्पष्ट दिसत होती. नवीन आशा, नवी स्वप्ने आणि नवा उत्साह घेऊन शाळेत लगबग, आनंद, उत्साह, हुरहुर, उत्सुकता अशा काही संमिश्र वातावरणात शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली शाळेचा पहिला दिवस मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रम
-
भोंडला कार्यक्रम
प्रशालेमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भोंडला कार्य ... Read More
-
शारदीय नवरात्रोत्सव ...
शाळेमध्ये नवरात्रीच्या पावन पर्वाचे औच ... Read More
-
'सायबर सुरक्षा आणि ज ...
आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा व ... Read More
-
भौतिकशास्त्र कार्यशा ...
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हाव ... Read More
-
जलशुद्धीकरण आणि सांड ...
अभ्यासक्रमातील घटकाशी संबंधित विषयाचे प्रत्यक्ष ... Read More