- Events /
- प्लास्टिक व ई-कचरा व्यवस्थापन मार्गदर्शन सत्र तसेच इको क्लब व ग्रीन क्लब उद्घाटन मोठ्या उत्साहात
प्लास्टिक व ई-कचरा व्यवस्थापन मार्गदर्शन सत्र तसेच इको क्लब व ग्रीन क्लब उद्घाटन मोठ्या उत्साहात
प्रशालेमध्ये प्लास्टिक व ई-कचरा व्यवस्थापन मार्गदर्शन सत्र तसेच इको क्लब (Eco Club) आणि ग्रीन क्लब (Green Club) उद्घाटन कार्यक्रम दिनांक १५ जुलै २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मा. मुख्याध्यापिका सौ. वासंती बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेतील इको क्लब तसेच ग्रीन क्लब यांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पूर्णम फाऊंडेशनच्यावतीने समन्वयक सौ. प्रियांका नागेशकर आणि सौ. सायली महाले उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिक व ई-कचऱ्याचे संकलन, त्याचे Reuse व Recycle या तत्त्वांवर आधारित योग्य व्यवस्थापन, तसेच पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पार पाडण्याच्या जबाबदाऱ्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. याशिवाय ई-कचऱ्यापासून वैज्ञानिक मॉडेल निर्मिती स्पर्धा (Scientific Model Making Competition Using E-Waste) याविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. अक्षय कुलकर्णी यांनी एका रोपट्याला पाणी घालून इको क्लबचे उद्घाटन केले आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश दिला.
कार्यक्रमादरम्यान इयत्ता ८ वी व ९ वी मधील विद्यार्थ्यांमधून इको क्लबसाठी सदस्य निवडण्यात आले. निवड झालेल्या सर्व सदस्यांनी पर्यावरण संरक्षणाची प्रतिज्ञा घेतली. या प्रतिज्ञेद्वारे पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, प्लास्टिकमुक्त परिसराची निर्मिती आणि ई-कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचा संकल्प करण्यात आला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षण, प्लास्टिक व ई-कचरा व्यवस्थापन याविषयी जागरूकता निर्माण झाली. तसेच इको क्लब आणि ग्रीन क्लबच्या माध्यमातून वर्षभर विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका सौ.मीनलताई आणि सौ. दीप्तीताई यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रम
-
भोंडला कार्यक्रम
प्रशालेमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भोंडला कार्य ... Read More
-
शारदीय नवरात्रोत्सव ...
शाळेमध्ये नवरात्रीच्या पावन पर्वाचे औच ... Read More
-
'सायबर सुरक्षा आणि ज ...
आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा व ... Read More
-
भौतिकशास्त्र कार्यशा ...
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हाव ... Read More
-
जलशुद्धीकरण आणि सांड ...
अभ्यासक्रमातील घटकाशी संबंधित विषयाचे प्रत्यक्ष ... Read More