प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • प्रवेशोत्सव २०२५-२६: विद्यार्थ्यांचे स्वागत भारतीय संस्कृतीनुसार

प्रवेशोत्सव २०२५-२६: विद्यार्थ्यांचे स्वागत भारतीय संस्कृतीनुसार

प्रवेशोत्सव २०२५-२६: विद्यार्थ्यांचे स्वागत भारतीय संस्कृतीनुसार

शैक्षणिक वर्ष 2025-26 चा प्रारंभ दरवर्षीप्रमाणे यावर्षी जून महिन्याच्या 16 तारखेला झाला. आजच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागताला शाळा सुसज्ज होती. दारात रांगोळी घालून प्रतिमांना हार घालून शाळेने विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी केली होती. विद्यार्थ्यांचे स्वागत अष्टगंध लावून आणि खडीसाखर देऊन करण्यात आले. अष्टगंध लावणे ही भारतीय संस्कृती आहे आणि ती आपण जपली पाहिजे हे  यातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले. सर्वप्रथम शाळेचा परिपाठ घेण्यात आला. प्रार्थने अगोदर सरस्वती पूजन करून विद्येची देवता सरस्वतीचे आशीर्वाद घेण्यात आले. त्यानंतर शिस्त विभाग प्रमुख श्रीयुत सुभाष निंबाळकर सरांनी शिस्त विषयक नियम सांगितले. त्यानंतर ज्येष्ठ  शिक्षक श्रीयुत अक्षय कुलकर्णी सरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या वर्ग शिक्षकांचा परिचय करून दिला. तसेच नव्यानेच आलेल्या आठवीतील विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांची ओळख करून दिली. त्यानंतर पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मधुरा बापट यांनी केले. तर सौ दीप्ती यादव, सौ सोनल एरंडे आणि सौ श्रद्धा साळवेकर यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यानंतर सौ. श्रद्धा साळवेकर यांनी विद्यार्थिनींना विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र सभा घेऊन त्यांना स्वच्छतेविषयक मौलिक मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांना वर्गात नेण्यात आले आणि तेथे विद्यार्थ्यांना वेळापत्रक आणि इतर सूचना देण्यात आल्या. 

कार्यक्रम

  • भोंडला कार्यक्रम

    भोंडला कार्यक्रम

    प्रशालेमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भोंडला कार्य ... Read More

  • शारदीय नवरात्रोत्सव निमित्त नवदुर्गा सन्मान विशेष कार्यक्रम

    शारदीय नवरात्रोत्सव ...

    शाळेमध्ये नवरात्रीच्या पावन पर्वाचे औच ... Read More

  • 'सायबर सुरक्षा आणि जागृती' (Cyber Security & Awareness) या विषयावर विशेष व्याख्यान

    'सायबर सुरक्षा आणि ज ...

    आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा व ... Read More

  • भौतिकशास्त्र कार्यशाळा

    भौतिकशास्त्र कार्यशा ...

    विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हाव ... Read More

  • जलशुद्धीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्राला इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

    जलशुद्धीकरण आणि सांड ...

    अभ्यासक्रमातील घटकाशी संबंधित विषयाचे प्रत्यक्ष ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स