- Events /
- सावित्रीबाई फुले जयंती
सावित्रीबाई फुले जयंती
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 'आधुनिक सावित्रींचा वर्ग' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावित्रीची वेशभूषा करून विद्यार्थिनी आणि शिक्षिका आल्या होत्या. लॅपटॉप, मोबाईल, टॅब, मोबाईल वापरून विद्यार्थिनीनी वर्गात विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान याविषयाचे अध्ययन केले. पारंपरिक वेशभूषेतील सावित्रीच्या लेकींनी आधुनिक शैक्षणिक साधनांचा वापर करून धडे घेतले. या कार्यक्रमातून सावित्रीबाई फुले यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने आदरांजली वाहण्यात आली. प्रशालेतील शिक्षिका सोनल एरंडे या स्वतः सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत होत्या.
सावित्रीबाईंचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय विद्यार्थीनींना व्हावा याकरिता आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन प्रशालेमध्ये करण्यात आले असल्याचे मुख्याध्यापिका वासंती बनकर यांनी सांगितले. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान, संस्कृती, परंपरा याला आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे आणि म्हणूनच या सावित्रीच्या लेकींनी स्मार्ट बोर्डच्या विज्ञान – तंत्रज्ञानाचे धडे घेतले अशा या सावित्रीच्या लेकींमुळेच भारत देश लवकरच महासत्ता बनेल याची खात्री वाटते असंही वासंती बनकर यांनी पुढे सांगितले. प्रशालेतील शिक्षिका प्रिया जोशी , श्रद्धा साळवेकर यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रम
-
भोंडला कार्यक्रम
प्रशालेमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भोंडला कार्य ... Read More
-
शारदीय नवरात्रोत्सव ...
शाळेमध्ये नवरात्रीच्या पावन पर्वाचे औच ... Read More
-
'सायबर सुरक्षा आणि ज ...
आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा व ... Read More
-
भौतिकशास्त्र कार्यशा ...
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हाव ... Read More
-
जलशुद्धीकरण आणि सांड ...
अभ्यासक्रमातील घटकाशी संबंधित विषयाचे प्रत्यक्ष ... Read More