- Events /
- संविधान दिन
संविधान दिन
दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. सर्व मुलांनी मिळून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले आणि प्रशालेतील इयत्ता नववी रेवतीतील विद्यार्थी शार्दुल संत यांने संविधानाचे महत्त्व, संविधान तयार करण्या पाठीमागची कारणे अशी माहिती सांगितली. प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्रीयुत प्रशांत जाधव सर यांनी इयत्ता दहावीच्या वर्ग प्रतिनिधींसह प्रतिमा पूजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे क्रीडा शिक्षक श्रीयुत सुभाष निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना दिलेली मूलभूत हक्क, अधिकार आणि कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सौ. प्रिया जोशी, सौ. विद्या पाटील आणि सौ. सोनल एरंडे यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रम
-
भोंडला कार्यक्रम
प्रशालेमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भोंडला कार्य ... Read More
-
शारदीय नवरात्रोत्सव ...
शाळेमध्ये नवरात्रीच्या पावन पर्वाचे औच ... Read More
-
'सायबर सुरक्षा आणि ज ...
आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा व ... Read More
-
भौतिकशास्त्र कार्यशा ...
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हाव ... Read More
-
जलशुद्धीकरण आणि सांड ...
अभ्यासक्रमातील घटकाशी संबंधित विषयाचे प्रत्यक्ष ... Read More