- Events /
- शाळेचा ४०वा वर्धापन दिन साजरा
शाळेचा ४०वा वर्धापन दिन साजरा
मंगळवार,दिनांक १० जून २०२५ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाचा ४० वा वर्धापन दिन अत्यंत आनंदात साजरा झाला. याप्रसंगी शाला समिती अध्यक्ष मा. श्री. मिलिंद कांबळे यांच्या हस्ते शालामातेच्या पाटीचे पूजन करण्यात आले . पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. सौ. अपर्णा साने, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. सौ. वासंती बनकर आणि प्राथमिक विभागाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ .राजश्री औटी यांनी शाला मातेचे पूजन केले. यावेळी पूर्वप्राथमिक ,प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मा.कांबळे सरांनी यावेळी सर्व शिक्षकांना शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच आगामी शैक्षणिक वर्षाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या . "नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वांनी आत्मसात करावे व त्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधावा" अशा अर्थाचा संदेश त्यांनी शिक्षकांना याप्रसंगी दिला. शाळेचा वर्धापन दिन आनंदात संपन्न झाला.
कार्यक्रम
-
भोंडला कार्यक्रम
प्रशालेमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भोंडला कार्य ... Read More
-
शारदीय नवरात्रोत्सव ...
शाळेमध्ये नवरात्रीच्या पावन पर्वाचे औच ... Read More
-
'सायबर सुरक्षा आणि ज ...
आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा व ... Read More
-
भौतिकशास्त्र कार्यशा ...
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हाव ... Read More
-
जलशुद्धीकरण आणि सांड ...
अभ्यासक्रमातील घटकाशी संबंधित विषयाचे प्रत्यक्ष ... Read More