- Events /
- वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न
प्रशालेत दिनांक 24 डिसेंबर, बुधवार रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी माजी नौदल अधिकारी अतुल धारवाडकर आणि सेंट मीराज महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापिका उषा सिन्हा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा.अपर्णा साने व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा.वासंती बनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शैक्षणिक वर्षात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मेहंदी रेखाटन, स्त्रोत्र पाठांतर, विद्यार्थी-शिक्षक स्पर्धा, पोस्टर बनविणे तसेच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तत्पूर्वी मा मुख्याध्यापिका सौ वासंतीताई यांनी प्रास्ताविकामधून शालेय प्रगतीचा आढावा घेतला.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे स्वराज सुभाष निंबाळकर या विद्यार्थ्याला उत्कृष्ट कामगिरीसाठी “सर्वोत्कृष्ट खेळाडू” पुरस्कार देऊन कौतुक करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मेहनत, शिस्त आणि देशभक्तीचे महत्त्व पटवून दिले. शालेय वयातच विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याला दिशा देण्यासाठी पावले उचलावीत असंही धारवाडकर यांनी यावेळी सांगितले. सौ सोनलताई यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तर सौ. श्रद्धाताई यांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन केले. सौ. मधुराताई यांनी सूत्रसंचालन केले तर सौ निलिमाताई यांनी आभार मानले.
कार्यक्रम
-
भोंडला कार्यक्रम
प्रशालेमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भोंडला कार्य ... Read More
-
शारदीय नवरात्रोत्सव ...
शाळेमध्ये नवरात्रीच्या पावन पर्वाचे औच ... Read More
-
'सायबर सुरक्षा आणि ज ...
आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा व ... Read More
-
भौतिकशास्त्र कार्यशा ...
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हाव ... Read More
-
जलशुद्धीकरण आणि सांड ...
अभ्यासक्रमातील घटकाशी संबंधित विषयाचे प्रत्यक्ष ... Read More