प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • वार्षिक स्नेहसंमेलन 2025

वार्षिक स्नेहसंमेलन 2025

वार्षिक स्नेहसंमेलन 2025

काळ बदलला तरीही, मूळ आपण विसरू नका,
संस्कृतीच्या पाऊलखुणा, कधीच पुसून टाकू नका. 
आधुनिकतेच्या युगातही, जपून ठेवा हा मान, 
भारतीय संस्कृती हीच, आपली खरी ओळख आणि शान. 

माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयाच्या वतीने यावर्षी ‘संस्कृतीच्या पाऊलखुणा’ या संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 13 डिसेंबर, 2025 रोजी अत्यंत उत्साहात साजरे करण्यात आले. भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. 

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करण्यात आली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे लोकमान्य टिळक आदी संस्थापक, संस्थेचे पहिले अध्यक्ष, गोळवलकर गुरुजी आणि सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिका डॉ. श्यामा घोणसे उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मनोगतात प्रशालेचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाची स्तुती केली. तसेच पालकांनी या चांगल्या मराठी माध्यमाच्या शाळेत घातल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मिलिंद कांबळे सर ( शाळेचे शाळा समिती अध्यक्ष) यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत संस्कृती जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांवर संस्कार महत्त्वाचे ठरतात असे प्रतिपादन केले.  

कार्यक्रम

  • भोंडला कार्यक्रम

    भोंडला कार्यक्रम

    प्रशालेमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भोंडला कार्य ... Read More

  • शारदीय नवरात्रोत्सव निमित्त नवदुर्गा सन्मान विशेष कार्यक्रम

    शारदीय नवरात्रोत्सव ...

    शाळेमध्ये नवरात्रीच्या पावन पर्वाचे औच ... Read More

  • 'सायबर सुरक्षा आणि जागृती' (Cyber Security & Awareness) या विषयावर विशेष व्याख्यान

    'सायबर सुरक्षा आणि ज ...

    आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा व ... Read More

  • भौतिकशास्त्र कार्यशाळा

    भौतिकशास्त्र कार्यशा ...

    विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हाव ... Read More

  • जलशुद्धीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्राला इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

    जलशुद्धीकरण आणि सांड ...

    अभ्यासक्रमातील घटकाशी संबंधित विषयाचे प्रत्यक्ष ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स